NAAC Peer Team visited on 3rd and  4th Sept. 2018, for the accreditation and assessment for 3rd cycle at our College.

स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयास NAAC ऑफिस, बेंगलोर यांनी पाठविलेल्या त्रिसदस्यीय समितीने दि.०३ व ०४ सप्टेंबर 2018 या दोन दिवशी महाविद्यालयास भेट दिली. NAAC पिअर टीमचे नेतृत्व गुजरात मधील पाटण येथील हेमचंद्र आचार्य विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.श्रीमती हेमिक्सा राव यांनी केले तर या NAAC पिअर टीमचे समन्वयक म्हणून डॉ.कार्तिक चंद्रपोल डी.बी.ए. विद्यासागर विद्यापीठ, मिदनापूर,बंगाल यांनी कार्य केले तर सदस्य म्हणून कर्नाटकातील प्रभात नगर उत्तर कैनरा येथील प्राचार्य डॉ.श्रीधर हेगडे यांनी काम पाहिले.