Select Page

समाजातील सर्व घटकांपर्यत गोर –गरिबांना शिक्षण देण्यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. परिसरातील तरुणांनी या संधीचा फायदा घेऊन सक्षम बनावे व समाज हि सक्षम कसा बनेल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी विद्यार्थांना केले. येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात प्राचार्यांच्या अभिभाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थांना संबोधित करताना प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी हे विचार व्यक्त केले. आपल्या ओघवत्या भाषणात त्यांनी विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक विध्यार्थाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी झपाटलेपण आवश्यक आहे. विद्यार्थांनी नियमित तासिका केल्या पाहिजेत. शिस्तीचे नियम पाळले पाहिजेत तरच यशाला गवसणी घालता येते असे मत व्यक्त केले. १२ वी तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत व स्पर्धा परीक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी घवघवीत यश मिळविले, महाविद्यालयाची यशोगाथा त्यांनी सादर केली. विद्यार्थी आम्हां शिक्षकांचे दैवत आहे. त्यांच्या पासूनच आम्हांला उर्जा मिळते हेच आमुचें पंढरपूर हीच आमची विठाई अशी भावना त्यांनी व्यक्त केली. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरनिय डॉ.सुरेश खुरसाळे व सन्माननीय संचालक मंडळाने विद्यार्थांसाठी अनेक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याचा आपल्या विकासासाठी वापर करावा असे आवाहन प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी केले. वाईट प्रवृत्तींना थारा देवू नका, अप प्रवृत्तींना घालवून लावा, महाविद्यालयातील मुलींची सुरक्षितता आपल्या सर्वांचीच जिम्मेदारी आहे हे विद्यार्थांनी समजून घ्यावे असे मत प्रतिपादित केले.

        प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले योगेश्वरी शिक्षण संस्थेचेसहसचिव मा.गणपत व्यास गुरुजी यांनी काव्य सादर केले. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव मेजर डॉ.शांतीनाथ बनसोडे यांनी केला. गुणवंत विद्यार्थाचे त्यांनी कौतुक केले. योगेश्वरी शिक्षण संस्थेने मराठवाड्यात आपला नावलौकिक प्रस्थापित केला आहे. आपला शैक्षणिक नावलौकिक वाढविण्याची, टिकविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मत प्रतिपादित केले.

        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाच्या संचालिका डॉ.शैलजा बरुरे यांनी केले. कनिष्ठ विभागाचे समन्वयक प्रा.व्ही.जी.राजपूत यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.एस.सोनटक्के यांनी केले तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रविण भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.