महाविद्यालयात संविधान दिन साजरा 2019-20
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात संविधान दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने संपन्न (अंबाजोगाई प्रतिनिधी) येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात संविधान दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व इतिहास विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी पी रुद्देवाड व मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख व्याखाते म्हणून महाविद्यालयातील राज्य शास्त्र विभाग प्रमुख प्रा रमेश सोनवळकर यांनी आपली भूमिका मांडली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका वठवली होती किंबहुना संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते सामाजिक , आर्थिक स्वातंत्र्याला त्यांनी प्राधान्य दिले होते. संविधान कितीही चांगले असले तरीही अंमलबजावणी करणारे चांगले असले पाहिजेत असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती असे मतं प्रा. रमेश सोनवळकर यांनी व्यक्त केले