Select Page

श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या क्रिडांगणावर आयोजीत बीड जिल्हा झोनल क्रिकेट स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाने दणदणीत एक हाती विजय संपादन केला. त्यांनी बीड येथील के.एस.के.महाविद्यालयाच्या संघाला चारीमुंड्या चीत केले.

श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या क्रिडांगणावर बीड जिल्हा झोनल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले व निर्धारित १० षटकात के.एस.के.महाविद्यालयाच्या संघाला ८८ धावात रोखले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या संघाने सामना जिंकण्यासाठी सईद व चेतन या सलामीच्या फलंदाजांना पाठविले. या फलंदाजांनी के.एस.के.महाविद्यालयाच्या गोलंदाजाची गोलंदाजी फोडून काढत, उत्तुंगछटकार, नेत्रदीपकचौकार तसेच चोरट्या धावा घेत दिलेले उद्दिष्ट २ षटके शिल्लक असताना एकही  गडी न गमावता साध्य केले. या फलंदाजांनी एक हाती दणदणीत विजय मिळवून बीड जिल्हा आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेमध्ये अंजिक्यपद प्राप्त केले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा संघ बीड जिल्हा झोनल क्रिकेट स्पर्धेचा विजेता ठरला तर के.एस.के.महाविद्यालय,बीड चा संघ उपविजेता झाला. विद्यापीठ स्तरावर खेळण्यासाठी या दोन्ही संघांना संधी मिळाली.

या यशाचे श्रेय खेळाडूंनी संघ व्यवस्थापक महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.प्रविण भोसले यांना दिले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकरराव चौसाळकर तसेच श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे, सहसचिव प्रा.एस.के.जोगदंड तसेच स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.एस.के.खिल्लारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या संघातील चेतन व सईद यांना संघ व्यवस्थापक डॉ.प्रविण भोसले, डॉ.किरण चक्रे, डॉ.सोनवणे, प्रा.भाबरदोडे यांनी रोख बक्षीसे दिली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या संघाने बलभीम महाविद्यालय, बीड च्या संघाचा पराभव करून अंतिम फेरित धडक मारली. या क्रिकेट स्पर्धेत प्रा.डॉ.दिग्रसकर, प्रा.पल्लेवाड, बिंबीसार वाघमारे, धम्मपाल वैद्य यांनी पंच म्हणून काम पहिले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद चे क्रिडा संचालक डॉ.अजयसिंग दिख्ख्त यांनी या स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.किरण चक्रे यांनी केले. राष्ट्र गीताने या बक्षीस वितरण समारंभाची सांगता झाली. या झोनल क्रिकेट स्पर्धेच्या खेळाचे बहारदार धावते समालोचन महाविद्यालयातील प्रा.अब्दुल रऊफ, प्रा.महेंद्र देशपांडे, प्रा.दिपक पालमकर, प्रा.श्रीराम शेप यांनी केले. त्यामुळे या क्रिकेट स्पर्धेची रंगत वाढली.

स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.एस.के.खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक पी.एन.कुलकर्णी, व त्यांचे सहकारी, नागेश लोदगे, संगणक विभागातील दीपक ठोंबरे, शमशुद्दीन, बाबरभाई, एकनाथ माने, बालासाहेब जाधव, वाहेदभाई, भारत वेडे यांनी परिश्रम घेऊन या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.