स्नेहसंमेलन 2017-18  

 स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात दि.०८ फेब्रुवारी २०१८ गुरुवार रोजी एक दिवसाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन लातूर येथील प्रसिद्ध कवी मा.योगीराज माने यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा.प्राचार्य हरिष देशपांडे हे राहणार आहेत. श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव ज्येष्ठ कवी श्री गणपत व्यास (गुरुजी) व प्रा.माणिकराव लोमटे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०:३० वा. उद्घाटन समारंभ होणार असून दुपारी ०४:०० वा. या स्नेहसंमेलनाचा समारोप होणार आहे. या दरम्यान संगीत खुर्ची, फन्सी ड्रेस स्पर्धा, शेला पागोटे, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

यावर्षी महाविद्यालयाने फक्त एकदिवसीय व अगदी साधेपणाने स्नेहसंमेलनाचे आयोजन करून आगाऊच्या होणाऱ्या खर्चास आळा घातला आहे व इतर महाविद्यालयांसमोर बचतीचा आदर्श घालून दिला आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या या विचारसरणीला विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. ही विशेष बाब होय. जेवणावरील खर्च टाळून अल्पोपहार देण्यात येणार आहे. अशी माहिती स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.श्रीराम शेप  यांनी दिली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु.शामल केंद्रे, कु.शितल मुंडे, चि.विशाल मस्के, कु.रेश्मा पोटभरे यांची निवड झालेली आहे. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी प्रा.बाबासाहेब सरवदे, समन्वयक प्रा.व्ही.जी.राजपूत हे परिश्रम घेत आहेत. या स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.आय.राठोड, उपप्राचार्य डॉ.प्रविण भोसले व पदव्युत्तर संचालिका डॉ.शैलजा बरुरे यांनी केले आहे.